कोयना धरण क्षेत्रातील दमदार पाऊस कायम असून, गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात २ टीएमसीने वाढ होऊन १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या या जलविद्युत प्रकल्पाचा पाणीसाठा ७५ टीएमसी म्हणजेच ७१.२५ टक्के झाला आहे.
गेल्या ३६ तासांत धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ९३ एकूण २,२०५, नवजा विभागात १६६ एकूण २,६४३ तर महाबळेश्वर विभागात १२८ एकूण २,३२८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाात पावसाळी हंगामाच्या ३७ दिवसात ४६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. सध्या धरणात सुमारे ३० हजार क्युसेक्स पाणी मिसळत आहे. धरणाचा पाणीसाठा तुलनेत समाधानकारक असून, गतवर्षीपेक्षा सव्वादोन पट जादा आहे. कृष्णा, कोयनाकाठी कराड, पाटण तालुक्यातही दिवसभर पावसाची रिपरिप राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 75 tmc waterstock in koyna dam
First published on: 14-07-2013 at 01:58 IST