संदेश पडवळ  :
या सगळ्या गोष्टींचा अभ्यासावर नक्कीच काही प्रमाणात परिणाम होतो. महाविद्यालयीन काळामध्ये शिक्षकांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही कलाकाराला किंवा खेळाडूला पूर्णपणे झोकून काम करता येत नाही. कला आणि अभ्यास याचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांना समजून घेणाऱ्या शिक्षकांची अवश्यकता असते. सुदैवाने असे शिक्षक बिर्ला महाविद्यालयामध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रणव आगाशे :
अभ्यासावर आपले महाविद्यालयामधील अस्तित्व अवलंबून असते. त्यामुळे स्पर्धा, खेळ, कला आदीं गोष्टी करता करता अभ्यासकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी बिर्ला महाविद्यालयामधील शिक्षक नेहमी प्रयत्नशील असतात. काही कारणांमुळे जर विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण नाही करू शकला, तर शिक्षक वैयक्तिकपणे विद्यार्थ्यांना मदत करतात.

अंजली सुरांजे :
नक्कीच शिक्षणोत्तर गोष्टी करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. मात्र अशा वेळी बिर्ला महाविद्यालयातील शिक्षक सर्वच क्षेत्रांतील स्पर्धकांना खूप मदत करतात. अशा शिक्षकांमुळे सर्व गोष्टी सांभाळून अशा स्पर्धामध्ये यशस्वी होता येते.

पल्लवी लेले  :    सुरुवातीपासूनच अभ्यासाकडे माझा जास्त कल नव्हता. त्यामुळे आपण कितीही अभ्यास केला तरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवू शकत नाही हे कळून चुकले होते. परंतु नृत्य माझा आत्मा आहे याची मला जाणीव होती. पण अभ्यासाच्या वेळी मित्र-मैत्रिणींनी खूप सहकार्य केले. आई-बाबांनीही जास्त अभ्यासासाठी कधी दबाव आणला नाही. त्यामुळे नृत्य करून मिळालेल्या वेळात अभ्यास करते.

भाग्यश्री भोईर  :   विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अभ्यासासोबत इतर गोष्टीही गरजेच्या असतात. त्याच्या काही प्रमाणात अभ्यासक्रमावर परिणाम होत असतो. त्यासाठी शिक्षकांची साथ अतिशय महत्त्वाची ठरते. स्पर्धासाठी काही दिवस बाहेर जावे लागते, अशा वेळी मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दुप्पट मेहनत घ्यावी लागते. सुदैवाने बिर्ला महाविद्यालयामधील प्राध्यापक अशा वेळी संपूर्ण सहकार्य करतात. इतर उपक्रम आणि अभ्यासक्रम याचा समतोल घडविण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य अतिशय महत्त्वाचे असते.

कांचन सकुंडे  :
सराव आणि स्पर्धा यामुळे वर्गामध्ये बसणे सहसा जमत नाही. पण महाविद्यालयाचे प्राध्यापक माझ्यासाठी त्यांना जमेल, तसे अधिकचे वर्ग घेतात. त्यामुळे खेळ असला तरी अभ्यास होतो.

अरुंधती देशपांडे   :
खेळाकडे विद्यार्थी केवळ साइड पार्ट म्हणून पाहतात. अनेकजण केवळ टक्केवारीत गुणांची वाढ व्हावी म्हणून खेळतात. पण असे करू नका, तुमचा खेळ तुम्हाला आयुष्याची एक वेगळी ओळख देऊ शकतो, पण त्याकडे आधी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची गरज आहे.

किशोर म्हात्रे  :
अभ्यास तितकासा चांगला नाही, पण अभ्यास केला नाही तर खेळता येणार नाही म्हणून कितीही सरावात असलो तरी अभ्यास करावाच लागतो.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accept academic studies stars
First published on: 02-07-2015 at 03:22 IST