सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर महिन्याभरात बेकायदा उभ्या राहणाऱ्या ७४१ वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करूनही येथील परिस्थिती सुधारत नाही. प्रवासी वाहतुकीसाठी मुंबईहून येणारी वाहने रस्त्याच्या कडेला थांबतात. मागून येणाऱ्या वाहनांचा विचार न करता ही प्रवासी घेतल्यानंतर तेथून थेट द्रुतगती महामार्गावर घुसवली जातात. त्यामुळे महामार्गावरील इतर वाहनांमधील प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले आहे. तरीही बेशिस्त बसचालक वाहतूक नियमांना फाटय़ावर मारत आहेत. याबाबत कळंबोली वाहतूक विभागाने ऑक्टोबर महिन्यात ७४१ जणांवर बेशिस्त वाहन चालविण्यामुळे शंभर रुपयांचा दंड आकारल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रदीप गिरिधर यांनी दिली. तरीही येथे बेशिस्त वाहने उभी करून बेशिस्त वाहन चालविणे सुरूच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken on un discipline drivers but problem not sloved
First published on: 12-11-2014 at 08:06 IST