जिल्हयात कर्मचाऱ्यांना शासन आदेशान्वये वेळीच वेतन अदा करून मासिक वेतन पत्रिका मिळावी, जिल्हयात आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर योजना लागू करावी, आदी प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना व कास्ट्राईब बहुउद्देशिय आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरूवारी राज्य कामगार विमा दवाखान्यासमोर लाक्षणिक उपोषणे करण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन कर्मचारी संघटनेने जिल्हा हिवताप अधिकारी व पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिली आहेत. वारंवार निवेदने देऊनही याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बारा व चोवीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला कालबध्द पदोन्नती मिळावी, सध्या बंद केलेला फिरती भत्ता प्राधान्यपूर्वक सुरू करावा, शहरी भागासह जिल्हयातील कर्मचाऱ्यांकडे दोनपेक्षा अधिक अतिरीक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यास अधिक वेतन व भत्ते अदा करावेत, शहरी भागातील कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता बिले मिळावे, याबाबत तसेच मूळ सेवा पुस्तकात मराठी, हिंदूी भाषेत नोंद व्हावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2013 रोजी प्रकाशित
आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
जिल्हयात कर्मचाऱ्यांना शासन आदेशान्वये वेळीच वेतन अदा करून मासिक वेतन पत्रिका मिळावी, जिल्हयात आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर योजना लागू करावी, आदी प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना व कास्ट्राईब बहुउद्देशिय आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरूवारी राज्य कामगार विमा दवाखान्यासमोर लाक्षणिक उपोषणे करण्यात आले.
First published on: 01-02-2013 at 12:28 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of health department employee