वैद्यकीय उपचाराची बाब दिवसेंदिवस अधिकच खर्चिक बनत चालल्याने गरजू व गरीब रुग्णांना आधुनिक व आवश्यक सेवासुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत, हे लक्षात घेऊनच आनंदऋषी रुग्णालयाने रुग्णांना अल्पदरात अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध करून आचार्य आनंदऋषींचा आदर्श जोपासला आहे. सरकारही रुग्णालयाच्या भावी उपक्रमांसाठी सहकार्य करेल, असे आश्वासन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.
रुग्णालयाला माणिक पब्लिक ट्रस्टने दोन व नगरसेवक धनंजय जाधव यांनी त्यांचे वडील कृष्णा जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक डायलेसिस यंत्र भेट दिले, त्याचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले, त्या वेळी विखे बोलत होते. या वेळी न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अधिकारी भीमराज वक्ते यांनी रुग्णालयाच्या डायलेसिस विभागास ३१ हजार रुपयांची देणगी दिली.
या वेळी र्मचट्स बँकेचे संस्थापक संचालक हस्तिमल मुनोत, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मुनोत, नगरसेवक जाधव, अभिजित लुणिया, डॉ. वसंत कटारिया आदींची भाषणे झाली. जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा यांनी रुग्णालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. आमदार सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, अनंत देसाई, बाळासाहेब हराळ, बाळासाहेब गिरमकर, सविता मोरे, डॉ. अविनाश मोरे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2013 रोजी प्रकाशित
आनंदऋषी रुग्णालयाचे उपक्रम कौतुकास्पद- विखे
वैद्यकीय उपचाराची बाब दिवसेंदिवस अधिकच खर्चिक बनत चालल्याने गरजू व गरीब रुग्णांना आधुनिक व आवश्यक सेवासुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत, हे लक्षात घेऊनच आनंदऋषी रुग्णालयाने रुग्णांना अल्पदरात अत्याधुनिक रुग्णसेवा उपलब्ध करून आचार्य आनंदऋषींचा आदर्श जोपासला आहे.

First published on: 09-09-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anandrishi hospital activities are creditable radhakrishna vikhe