शहरातील बाबा पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगाने पोलीस हवालदाराच्या अंगावर दुचाकी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. महम्मद फिरोज खान असे आरोपीचे नाव असून तो परळी वैजनाथ येथील आहे. त्याच्याकडून दोन मंगळसूत्र जप्त करण्यात आल्याने हा आरोपी मंगळसूत्र चोरी करणारा गुन्हेगार असावा, असा पोलिसांना संशय आहे.
सकाळी साडेआठच्या सुमारास बाबा पेट्रोलपंपावर वाहतूक सुरळीत राहावी म्हणून कार्यरत असणारे हवालदार डी. एम. मांटे व गजानन मांटे या दोघांनी पल्सर चालविणाऱ्या दोघांना अडविण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर दोघेजण होते. त्यांच्या दुकाचीला समोरच्या बाजूने नंबरही नव्हता. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्यांना अडविले. या वेळी त्यांनी पोलिसांच्या अंगावर दुकाची घालण्याचा प्रयत्न केला. यातील एक आरोपी पळून गेला. त्याचे नाव अली जाफरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोघे आरोपी सराईत मंगळसूत्र चोर असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest of mangalsutra theft
First published on: 30-09-2013 at 01:50 IST