पाचगणी टेबल लँडवरील घोडागाडीला परवानगी देता येऊ शकते का, याचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आज एका समितीची स्थापना केली. या भागातील पर्यावरणाला व नैसर्गिक सौंदर्याला धक्का न लागता घोडागाडी व घोडेस्वारीस परवानगी देता येईल का? तसेच ही परवानगी दिल्यास तेथील खुरटय़ा वनस्पती व प्राणी जीवनावर परिणाम होईल. यासाठी ही समिती दहा दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.
पाचगणीत येणारे पर्यटक मोठय़ा संख्येने टेबलँडला भेट देत असतात. येथील लहान लहान रोपटी पर्यटकांचे आकर्षण आहे. तसेच डायनॉसॉरच्या कालावधीपासूनचे प्राणीजीवन येथे अस्तित्वात आहे. त्याला घोडागाडी व घोडेस्वारीमुळे धक्का लागू शकतो. असे पर्यावरण तज्ज्ञांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी अहवाल देण्यासाठी एक समिती गठीत केली असून या परिसराची पाहणी करून आपला अहवाल सादर करण्याची मुदत दहा दिवसांची देण्यात आली आहे.
पाचगणीच्या टेबल लँडवर घोडेस्वारी करत असताना सहलीला आलेल्या मुंबई येथील पर्यटक मुलीचा घोडागाडी दरीत कोसळून मृत्यू झाला होता. त्यामुळे घोडेस्वारीवर या परिसरात बंदी घालण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
घोडागाडी परवानगी संदर्भात समितीची स्थापना
पाचगणी टेबल लँडवरील घोडागाडीला परवानगी देता येऊ शकते का, याचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आज एका समितीची स्थापना केली. या भागातील पर्यावरणाला व नैसर्गिक सौंदर्याला धक्का न लागता घोडागाडी व घोडेस्वारीस परवानगी देता येईल का? तसेच ही परवानगी दिल्यास तेथील खुरटय़ा वनस्पती व प्राणी जीवनावर परिणाम होईल. यासाठी ही समिती दहा दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.
First published on: 20-12-2012 at 09:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on coach ride on panchgani tablelands