बसचालकाला बेदम मारहाण

घराजवळ बस थांबवली नाही म्हणून गोंडेगाव येथील दोघा तरुणांनी बसचालकाला बेदम मारहाण केली. जखमी चालकावर कामगार रुग्णालयात औषधोपचार सुरू असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घराजवळ बस थांबवली नाही म्हणून गोंडेगाव येथील दोघा तरुणांनी बसचालकाला बेदम मारहाण केली. जखमी चालकावर कामगार रुग्णालयात औषधोपचार सुरू असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोपरगावकडे पुणतांबामार्गे निघालेल्या बसमधून गोंडेगाव येथील अमोल भाऊसाहेब फोपसे व बंटी राहिंज हे दोघे तरुण प्रवास करीत होते. गोंडेगाव येथे फोपसे वस्तीजवळ बसथांबा आहे. थांब्यापासून बस थोडी लांब गेली, त्या वेळी बसचा चालक सखाहरि रामभाऊ मनकर (वय ५७) याच्याबरोबर दोघांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यांनी मनकर यास गाडीच्या खाली ओढून बेदम मारहाण केली. त्यांच्या डाव्या बरगडीला मार लागला. बसच्या चालकांना मारहाण करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हे प्रकार बंद झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beating to busdriver

ताज्या बातम्या