‘ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी ऑफ इंडिया’ (बीईई) आता मध्यम आणि लघु उद्योगांना ऊर्जा बचतीचे धडे देणार आहे. मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती बीईईमधील ऊर्जा आणि पर्यावरण तज्ज्ञ विशाल अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एस. बी. इंजिनिअर्सचे कार्यकारी अधिकारी सुनील जवळेकर उपस्थित होते. भारतात मध्यम आणि लघु उद्योगांचे मोठे जाळे आहे. या उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणावर वीज किंवा इंधन खर्च होत आहे.
 मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्राला आता बीईई ऊर्जा बचतीचे धडे देणार असून त्यासाठी कार्यशाळाही आयोजित करणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य केले आहे. उद्योगांचे छोटे गट तयार करून त्या गटांनी ऊर्जा बचतीचे उपाय योजण्यासाठी बीईईकडून आर्थिक आणि तांत्रिक आणि आर्थिक पातळीवर मदत करण्यात येणार आहे.