चॅनल बी च्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त यंदाच्या भीमा फेस्टिव्हलअंतर्गत राजर्षी शाहू खासबाग मैदान येथे १९ व २० जानेवारी या दोन दिवशी अनेक नामवंत कलाकारांचा कलाविष्कार सादर होणार आहे.‘कलापूरचे व्यासपीठ-रसिकांना पर्वणी’ हे ब्रीदवाक्य घेऊन यंदा चॅनल बी च्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त भीमा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेस्टिव्हलअंतर्गत १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राजर्षी शाहू खासबाग मैदान येथे स्वरताज या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या रिअ‍ॅलिटी शो स्वरताजचा ग्रँड फिनाले कार्यक्रम होणार आहे. स्वरताजच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहचलेले कोल्हापूर आणि सांगलीतील उद्योन्मुख यशपाल देवकुळे, कोणार्क शर्मा, भक्ती साळुंखे, अभिषेक काळे, संदीप वाडेकर या टॉप फाईव्ह कलाकारांतील अंतिम संगीतमय सामना पाहता येणार आहे. तर झी मराठी वाहिनीवरील डान्स महाराष्ट्र डान्स आणि फू बाई फू मधील कलाकारांचा कलाविष्कार पाहायला मिळणार आहे. स्वरताजसाठी अवधूत गुप्ते यांची विशेष उपस्थिती असणार आहे. झी मराठी या कार्यक्रमासाठी सॅटेलाईट चॅनल पार्टनर आहे. तर याच दिवशी सई ताम्हणकर, उमेश कुलकर्णी, गिरीष कुलकर्णी असे कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.    २० जानेवारी रोजी मनोरंजन तडका, हा म्युझिक, डान्स व कॉमेडीचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. त्यामध्ये नेहा पेंडसे, दीपाली सय्यद, मृण्मयी देशपांडे यांचे नृत्याविष्कार तसेच अभिजीत चव्हाण, कमलाकर सातपुते यांची स्टँडअप कॉमेडी आणि ऋषीकेश कामेरकर, नेहा राजपाल, निहीरा जोशी, जितेंद्र अभ्यंकर यांची गाणी सादर होणार आहेत. याशिवाय प्रसिध्द अभिनेते अतुल कुलकर्णी आणि चक दे इंडिया फेम सागरिका घाटगे या भीमा फेस्टिव्हलला खास उपस्थित राहणार आहेत. नाईन एक्स झकास ही मराठीतील पहिली संगीत वाहिनी या कार्यक्रमासाठी म्युझिक पार्टनर आहे. यंदाच्या भीमा फेस्टिव्हलचे प्रायोजक गुरुप्रसाद ज्वेलर्स आणि गोकुळ दूध संघ हे आहेत. तर वासन आय केअर आणि ए टू झेड ग्रुप हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.