वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित २३ व्या कला-क्रीडा महोत्सवात नेचर अँड एन्व्हायरमेंट सोसायटी ऑफ ठाणे (नेस्ट) या पक्षीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सचिन मेन यांनी संपादित केलेल्या ‘बर्ड्स ऑफ व्हीव्हीसीएमसी’ या पक्षीसूचीचे प्रकाशन महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला माजी क्रिकेटपटू राजेश चौहान, ऑलिम्पिक पदक विजेते विजेंदर सिंह, खासदार बळीराम जाधव, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार विलास तरे, महापालिका आयुक्त किशोर बोर्डे आदी मान्यवर उपस्थि होते.
या पक्षीसूचित ४७ पक्षीकुळातील वसई तालुक्यातील वनांत व पाणथळ परिसरात आढळणाऱ्या १६० पक्षीप्रजातींची सचित्र माहिती संकलीत करण्यात आली आहे. या विविध प्रजातींच्या पक्ष्यांना अभय मिळावे,  त्यांचे संरक्षण – संवर्धन व्हावे म्हणून सर्वेक्षण करून ही सूची तयार करण्यात आली असे सचिन मेन यांनी सांगितले.