वांद्रयाच्या आर. डी. नॅशनल महाविद्यालयात सध्या सांस्कृतिक महोत्सवाची धामधूम सुरू आहे. नॅशनलने यंदा आपल्या ‘ब्लो फेस्ट’ महोत्सवाचे स्वरूप आणखी व्यापक करून स्पर्धाचे आयोजन आंतर महाविद्यालयीन स्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे.
 गुरुवारपासून सुरू झालेल्या नॅशनलच्या महोत्सवात कला, क्रीडा आणि साहित्याशी संबंधित विविध स्पर्धाची रेलचेल आहे. मुंबई शहरावर होणारी दोन व्याख्याने हे या महोत्सवाचे आणखी एक आकर्षण. साहित्यिक मुश्ताक शेख आणि आर्किटेक्ट विकास दिलावरी हे ‘इन्क्रेडीबल मुंबई’चे बॉलिवूड आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून अंतरंग उलगडतील.
२२ डिसेंबपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात चित्रकला, वॉल पेटिंग, कार्टुनिंग, फोटोग्राफी, क्लेमॉडेलिंग, टेबल टेनिस, कुस्ती, वादविवाद, निबंध, पाककृती, पॉवरलिफ्टिंग, प्रश्नमंजुषा, नृत्य, बुद्धिबळ, कॅरम, फुटबॉल आदी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.