‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ या विषयावरील ‘बॉर्न १’ या एकांकिकेने सवाई एकांकिका स्पर्धेत पहिल्या क्रमांकासह सहा पुरस्कार पटकावत बाजी मारली. ‘मडवॉक’ या एकांकिकेला प्रेक्षक पसंतीच्या पारितोषिकासह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सुबोध भावे, मिलिंद फाटक आणि सीमा देशमुख यांनी या वेळी परीक्षकांची जबाबदारी पार पाडली. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – सर्वोत्तम प्रथम एकांकिका : बॉर्न १ (आय.एम.सी.सी., पुणे), प्रेक्षक पसंतीची आणि द्वितीय एकांकिका : मडवॉक (सी.एच.एम.अक्षर, उल्हासनगर), सर्वोत्तम लेखक : मानस लयाळ (बॉर्न १), सर्वोत्तम दिग्दर्शक : अजिंक्य गोखले (बॉर्न १), सर्वोत्तम अभिनेता : अभिजित पवार (मडवॉक), सर्वोत्तम अभिनेत्री : तन्वी कुलकर्णी (बॉर्न १), सर्वोत्तम नेपथ्य : सुयोग भोसले (मडवॉक), सर्वोत्तम ध्वनी संयोजक : प्रतीक केळकर (बॉर्न १), सर्वोत्तम प्रकाश योजनाकार : सचिन शेकदार, अक्षय जोशी (बॉर्न १).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Born one got first prize in sawai ekankika spardha
First published on: 28-01-2015 at 06:59 IST