महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय बालनाटय़ स्पर्धेत कोराडीच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘साक्षात्कार’ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
चिटणवीस नगरातील कामगार कल्याण केंद्राच्या सभागृहात या स्पर्धा नुकत्याच झाल्या. लेखक व दिग्दर्शक मदन गायकवाड यांच्या ‘साक्षात्कार’ बाल एकांकिकेला चार पारितोषिके मिळाली.
वसंतनगर कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘थेंब थेंब श्वास’ या बालनाटय़ाला द्वितीय क्रमांक, खापरखेडा केंद्राने सादर केलेल्या ‘आकाशातील खजिना’ला तृतीय क्रमांक मिळाला. दिग्दर्शनामध्ये अतुल सोमकुँवर यांच्या ‘थेंब थेंब श्वास’ला प्रथम, मदन गायकवाड यांच्या ‘साक्षात्कार’ला द्वितीय तर प्राची दाणी यांच्या ‘आकाशातील खजिना’ला तृतीय क्रमांक मिळाला. उत्कृष्ट अभिनय मुले- शुभम गजभिये (साक्षात्कार) प्रथम, मयूर अंडेलकार (फुटपाथ) द्वितीय आणि मृणाल शिर्के (साक्षात्कार) तृतीय क्रमांक मिळाला. उत्कृष्ट अभिनय मुली – स्नेहा वाघमारे (थेंब थेंब श्वास) प्रथम, रुपल टेकाडे (आकाशातील खजिना) द्वितीय पुनम राऊत (पेटवा विठ्ठल) तृतीय क्रमांक मिळाला.
‘साक्षात्कार’मध्ये काम करणारे बाल कलावंत कोराडीच्या प्रागतिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शुभम गजभिये, रोहित पौतारे, वासू पौतारे, मृणाल शिरके, निखील सोनेकर, प्रणय पाटील, साहील रेवतकर, विकास मौजे, लवेश आसटकर, रसना कारेमोरेस प्राची ठाकरे, श्रद्धा आतकरी, सीमा चौधरी व आनंद बाळापुरे यांनी उत्कृष्ट अभिनय केला. कामगार कल्याण अधिकारी अरुण कापसे आणि सहकाऱ्यांनी स्पर्धेसाठी सहकार्य
केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभय आंजीकर, किशोर डाऊ, दीपाली करमरकर यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव पाठक, व्यवस्थापक भोजराज पौनीकर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2012 रोजी प्रकाशित
कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय बालनाटय़ स्पर्धेत ‘साक्षात्कार’ प्रथम
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विभागीय बालनाटय़ स्पर्धेत कोराडीच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘साक्षात्कार’ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
First published on: 06-12-2012 at 01:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child play act competition sakashtkar came first