राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात ३० व ३१ ऑक्टोबरला  लिंबूवर्गीय फळ उत्पादकांचा राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हे केंद्र दर्जेदार फळ उत्पादनाकरिता तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करीत असून हे काम शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. लिंबूवर्गीय फळांवर विदर्भाकरिता तंत्रज्ञान अभियानातर्फे संत्री, मोसंबी, लिंबू उत्पादकांचा राष्ट्रीय पातळीवरील  मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देशातील ७-८ राज्यांतील हजारावर शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहतील.
या मेळाव्यादरम्यान लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात ‘लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात संत्री, मोसंबी, लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळांच्या नमुन्यांना तसेच बचतगटाद्वारे केलेल्या लिंबूवर्गीय प्रक्रिया उत्पादकांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे रोख रूपात पारितोषिके देण्यात येईल. लिंबूवर्गीय फळ उत्पादकांनी आणि प्रक्रियेच्या संबंधित स्वयंरोजगार असणाऱ्यांनी फळाचे कमीतकमी १०-१२ नुमने राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात ३० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजेपर्यंत आणावेत, अशी विनंती करण्यात येत आहे. आपली नोंदणी डॉ. आशुतोष मुरकुटे (९८६००९९२१४१), डॉ. आय.पी. सिंग (९४०३९२९१४५), डॉ. एम.आर. चौधरी (९४१३२०४९८५) व पी.डी. कोरडे (९४२२३३३५२५) यांच्याकडे करावी. शेतक ऱ्यांनी या मेळाव्यात भाग घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी केली आहे. वेगवगळ्या विषयावरील तज्ज्ञ स्लाईड शो च्या माध्यमाने नवीन तंत्रज्ञानाची माहिती देतील, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citrus fruit producers national gathering on october 30 and
First published on: 16-10-2014 at 01:23 IST