वृत्तपत्र वितरक हा वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वात कमजोर घटक असून, हा घटक आíथकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी या क्षेत्रातील सर्वानीच सहकार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.
लातूर जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या मराठवाडा विभागीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय श्रमिक संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर जाधव, तर प्रमुख म्हणून आमदार वैजनाथ िशदे, महापौर स्मिता खानापुरे, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण, सचिव सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कोषाध्यक्ष बालाजी पवार उपस्थित होते. डॉ. वाघमारे म्हणाले, वृत्तपत्रसृष्टी प्रचंड वेगाने बदलते आहे. काळाच्या ओघात ध्येयवाद संपून या क्षेत्राचेही झपाटय़ाने व्यापारीकरण झाले आहे. वृत्तपत्रांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे होणाऱ्या स्पध्रेतून नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्राहकांपर्यंत अपार कष्ट करून वृत्तपत्र वितरीत करणारा सर्वात कमजोर घटक आíथकदृष्टय़ा सक्षम बनला पाहिजे, त्यासाठी वृत्तपत्र मालक व सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे.
संघटनेचे अध्यक्ष गोपीनाथ चव्हाण म्हणाले, की राज्यात साडेतीन लाख वृत्तपत्र विक्रेते आहेत. शासनदरबारी मागण्यांसाठी खेटे घालावे लागतात. सरकारच्या वतीने खोटी माहिती दिली जाते. एकाच वेळी वृत्तपत्राचे मालक व राज्य सरकार या दोघांकडूनही आमच्या प्रश्नांची हेळसांड होत आहे. महापौर खानापुरे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्टॉल उपलब्ध करण्यास नियमाच्या अधीन राहून सहकार्य करू, असे आश्वासन दिले. संघटनेचे राज्य सरचिटणीस सुनील पाटणकर यांनी राज्यातील सुमारे १ कोटी घरांत वृत्तपत्र जाते. या क्षेत्रातील स्पर्धा अतिशय विपरीत आहे. सगळीकडे महागाई वाढली असताना वृत्तपत्रांची किंमत मात्र वाढत्या स्पध्रेत कमी ठेवली जाते. वृत्तपत्रांनी किंमत कमी केली, म्हणून त्याचा थेट परिणाम वृत्तपत्र विक्रेत्यांवर होतो. आम्ही यापुढे आíथक झळ सहन करणार नाही. आम्हाला मिळणाऱ्या किमान उत्पन्नात बदल होता कामा नये, अन्यथा कोणते पेपर विकायचे व कोणते विकायचे नाहीत हे आम्ही ठरवू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
आमदार िशदे यांनी संघटनेच्या मागण्यांसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. म्हाडाअंतर्गत घरे मिळण्यात अडचण असेल तर त्यासाठी शब्द टाकू, असे आश्वासन दिले. अॅड. श्रीधर जाधव यांनी मुंबईतील डबेवाल्यांइतक्याच निष्ठेने वृत्तपत्र वितरक अखंड काम करतात. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या अजिबात अवास्तव नाहीत. माणूस म्हणून वागणूक दिली जावी व घर चालेल इतके पसे या व्यवसायातून प्रत्येक वितरकाला मिळावेत, इतकीच माफक अपेक्षा असल्याचे सांगितले. आता वितरकही शहाणा झाला आहे. तो संघटित होत आहे. आपल्या मागण्यांसाठी तो यापुढे नक्कीच संघर्ष करेल, असे ते म्हणाले. जगदीश उंबरदंड यांनी प्रास्ताविक केले. अशोक भांगे यांनी आभार मानले. अधिवेशनास मराठवाडय़ासह राज्याच्या अन्य भागातून प्रातिनिधिक स्वरूपात विक्रेते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलातूरLatur
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conference of news paper sell organisation
First published on: 28-01-2014 at 01:30 IST