आम आदमी पक्षाची तक्रार
शिक्षण खात्यातील   भ्रष्टाचार  न्यायालयाच्या    निदर्शनास आणून देत न्यायालयाच्या निर्देशानुसार   जबाबदार   अधिकाऱ्यांवर   गुन्हा    नोंदविण्यास    भाग   पाडणाऱ्या इकबाल   अहमद   या  येथे    हातमजुरी  करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांला   जीवे   मारण्याची   धमकी   देत   हल्ला    करण्यात आला.
 या   हल्ल्यामागे    शिक्षण    खात्यातील    भ्रष्टाचार प्रकरणात    गुन्हा दाखल झालेले अधिकारी असल्याचा आरोप    आम    आदमी   पक्षाच्या वतीने    करण्यात    आला  आहे. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांना पक्षातर्फे यासंदर्भात निवेदन देण्यात आले. इकबाल अहमद यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीविरोधात तक्रार केल्याने हा हल्ला झाला असून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा अशा व्यक्तींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडू शकते अशी भीती पक्षाचे शहर समन्वयक वसिम शेख, शहर सचिव मनोज बडगुजर, शहर सहसचिव डॉ. संजय पिंगळे, डॉ. एस. मलिक आदींनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onधुळेDhule
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corrupt education officer is responsible for that offense
First published on: 12-02-2014 at 09:18 IST