महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा व बेछूट वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी निषेध केला असून सोलापुरचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पाठवून ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सत्तेच्या लालसेने अंध झालेल्या ठाकरे यांनी अजित पवार यांच्या वाटेला जाण्याचे धाडस करु नये, अन्यथा राष्ट्रवादी युवक तीव्र भूमिका घेईल, असा इशारा  देऊन काळे यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी किती काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे, ते ठाकरे यांनी सांगण्याची आवश्यकता नाही, ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, केवळ भडक वक्तव्य करुन तरुणांना आकर्षित करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे, परंतु पवार हेच तरुणांचे नेते आहेत, ठाकरे हे नकलाकार असल्याने केवळ मनोरंजनासाठी त्यांच्या सभांना गर्दी होते.