गणिताच्या बागुलबुवावर भावे प्रशालेमध्ये उत्तर मिळणार आहे. राष्ट्रीय गणित वर्ष आणि गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त भावे प्रशालेमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये साधारण शंभरहून अधिक मॉडेल्स आणि तक्ते सादर करण्यात आले आहेत. बहुतेकोंना कठीण वाटणारा गणित विषय या प्रदर्शनामध्ये सोपा करून मांडण्यात आला आहे. कोडी, आकडय़ांशी खेळ, किचकट वाटणाऱ्या प्रमेयांची सोपी मांडणी अशा विविध माध्यमातून गणिताची मांडणी करण्यात आली आहे. विज्ञानभारती आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्रशालेने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते शुक्रवारी (७ डिसेंबर) करण्यात आले असून ९ डिसेंबपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या शिवाय गणितासंबंधी विविध विषयांवर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गणिती कोडी सोडवण्याची ‘गणित रंजन’ ही स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2012 रोजी प्रकाशित
गणिताची रंजकता वाढवणारे जिल्हास्तरीय गणित प्रदर्शन
गणिताच्या बागुलबुवावर भावे प्रशालेमध्ये उत्तर मिळणार आहे. राष्ट्रीय गणित वर्ष आणि गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीनिमित्त भावे प्रशालेमध्ये जिल्हास्तरीय गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये साधारण शंभरहून अधिक मॉडेल्स आणि तक्ते सादर करण्यात आले आहेत. बहुतेकोंना कठीण वाटणारा गणित विषय या प्रदर्शनामध्ये सोपा करून मांडण्यात आला आहे. कोडी, आकडय़ांशी खेळ, किचकट वाटणाऱ्या प्रमेयांची सोपी मांडणी अशा विविध माध्यमातून गणिताची मांडणी करण्यात आली आहे.
First published on: 08-12-2012 at 03:57 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distrect level maths exhibition