कोणत्याही कामात अडथळा आणण्याची सवय असलेल्या शामकांत सनेर यांची इंचभरही जमीन शिंदखेडा तालुक्यात नसताना उगीचच विकासाच्या गप्पा मारून नयेत, असा सल्ला देत भाजपचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष कामराज निकम यांनी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सनेर यांची चांगलीच कानउघाडणी केली.
धुळ्यात राहून शिंदखेडा तालुक्यातील राजकारणात ढवळाढवळ करणाऱ्या सनेर यांना औष्णिक विद्युत प्रकल्पाचा एवढाच पुळका असेल तर विखरणमध्ये येऊन त्यांनी शेतकऱ्यांना राजी करावे. असेही निकम यांनी नमूद केले आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दोंडाईचा औष्णिक वीज प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यास विरोध केला असल्याने आ. जयकुमार रावल यांनी या संदर्भात खडसे यांना जाब विचारावा, असा सल्ला सनेर यांनी याआधी दिला होता. त्यामुळे संतप्त झालेले भाजपचे शिंदखेडा तालुक्यातील पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी सनेर यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. औष्णिक प्रकल्पासाठी सुमारे ९० टक्के जमिनीचे संपादन झाले आहे.
उर्वरित १० टक्के जमीन संपादनाची गरज असली तरी त्यातील बहुतेक भाग बागायती आहे. ज्या बागायतदारांचा उदरनिर्वाह त्यांच्या शेतीवरच आहे ते त्यांची जमीन प्रकल्पासाठी देताना निश्चितच अनेक वेळा विचार करतील. ज्यांची या भागात इंचभरही जमीन नाही त्यांना काय जमिनीचे मोल कळणार, असा उपरोधिक टोलाही निकम यांनी सनेर यांना उद्देशून लगावला आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे, असे निकम यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2013 रोजी प्रकाशित
सनेर यांनी फुकाच्या गप्पा न मारण्याचा भाजपचा सल्ला
कोणत्याही कामात अडथळा आणण्याची सवय असलेल्या शामकांत सनेर यांची इंचभरही जमीन शिंदखेडा तालुक्यात नसताना उगीचच विकासाच्या गप्पा मारून नयेत, असा सल्ला देत भाजपचे शिंदखेडा तालुकाध्यक्ष कामराज निकम यांनी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सनेर यांची चांगलीच कानउघाडणी केली.
First published on: 06-06-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not gossip bjp advice to saner