येथील स्टेट बँकेच्या शाखेत सत्तावीसशे रुपयांच्या बनावट नोटा भरण्यात आल्याची फिर्याद वाई पोलिसात दाखल झाली आहे.
मार्च २०१२ ते ऑक्टोबर २०१२च्या दरम्यान एक हजाराच्या दोन, पाचशेची एक व शंभर रुपयाच्या दोन बनावट नोटा बँकेत भरण्यात आल्या. वास्तविक मशिनद्वारे सर्व नोटा तपासल्या जातात. तरीही बनावट नोटा भरण्यात आल्याची फिर्याद सुनीता नागपुरे (सध्या सिद्धनाथवाडी, वाई, मूळ रोड पुणे) यांनी वाई पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास फौजदार जी. डी. ठाकरे करत आहेत.