सहकारी तत्त्वावर सदस्यांकडून चालवल्या जाणाऱ्या आशियातील एकमेव अशा शुश्रुषा हॉस्पिटलचा विस्तार करण्यात येणार असून विक्रोळी येथे अद्ययावत रुग्णालय येत्या दोन वर्षांत उभारले जाणार आहे. सहकारी तत्त्वावर आधारलेल्या शुश्रुषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटलचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त कन्नमवार नगर, विक्रोळी येथे १२० खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हे नवे रुग्णालय ऑक्टोबर २०१६ पर्यंत कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. यात १७ खाटांचे अद्ययावत आयसीसीयूही राहील.
सहकारी तत्त्वावर रुग्णालय सुरू करण्याची संकल्पना दिवंगत डॉ. वसंत रणदिवे यांनी १९६० साली मांडली होती. १९६९ साली दादरमध्ये हे रुग्णालय सुरू झाले, तेव्हा ३ हजार लोकांनी प्रत्येकी १०० रुपयांचा एक समभाग खरेदी केला होता. आज त्याचे १८ हजार सदस्य आहेत.
नागरिक आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन सहकारी रुग्णालय चालवण्याचा हा प्रयोग विक्रोळीतही केला जाणार आहे.
दहा हजार रुपये भरून जे नागरिक या रुग्णालयाचे सदस्य होतील, त्यांना निदान आणि उपचारासह आरोग्यविषयक सेवांमध्ये सवलत दिली जाईल. एकदा ही रक्कम भरल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर हा लाभ मिळू शकेल. इतकेच नव्हे, तर संचालक मंडळ निवडण्याची मुभा आणि स्वत: निवडून जाण्याचा पर्यायही त्यांना राहील, असे शुश्रुषा नागरिक सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नंदू लाड यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2014 रोजी प्रकाशित
शुश्रुषा रुग्णालय विक्रोळीत उभारणार
सहकारी तत्त्वावर सदस्यांकडून चालवल्या जाणाऱ्या आशियातील एकमेव अशा शुश्रुषा हॉस्पिटलचा विस्तार करण्यात येणार असून विक्रोळी येथे अद्ययावत रुग्णालय येत्या दोन वर्षांत उभारले जाणार आहे.
First published on: 19-09-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansion of vikhroli shushrusha hospital