आदर्श घोटाळय़ातील भ्रष्टाचारी मंत्र्यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पाठीशी घालत असल्याचा आरोप व निषेध करीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे गांधी चौकात दहन करण्यात आले.
आदर्श घोटाळय़ात जे जे मंत्री, मुख्यमंत्री अडकले आहेत, त्यांना क्लीन चिट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला आहे. आदर्श घोटाळय़ात ज्या मंत्र्यांचे हात काळे झाले आहेत, त्यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
भाजपच्या वतीने या मागणीसाठी राज्यभर मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. आदर्श घोटाळय़ातील सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आमदार सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते रमेश हाके, माजी आमदार टी. पी. कांबळे, जिल्हा सरचिटणीस प्रा. विजय क्षीरसागर, वसंत डिगोळे, शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर आदी उपस्थित होते.