दवाख्यान्यात उपचारासाठी निघालेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जळगाव आणि कोलकाता येथे सामूहिक बलात्कार झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी खारघर येथील राहणारी आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार, अपहरण आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अफसर सदू सय्यद, मनोज नंदू तायडे, विनोद नंदू तायडे आणि युनूस सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. सदर तरुणी एक महिन्यापूर्वी उपचार घेण्यासाठी दवाखान्यात निघाली असता, मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी तरुणीला त्यांच्याच गावातील राहणारे असल्याची थाप मारून विश्वास संपादन केला. यानंतर तुझा भाऊ कल्याण येथे आला असून तो कोलकात्याला जाणार असल्याचे सांगितले. यापूर्वी त्याला तुला भेटायचे असल्याचे सांगत, तिला मोटारसायकलवर बसवून कल्याण रेल्वे स्थानक येथे आणले. मात्र रेल्वे स्थानकावर ते येण्यापूर्वीच उभ्या असलेल्या यातील दोघा आरोपींनी गाडीची वेळ झाल्यामुळे तिचा भाऊ निघून गेला असल्याचे तिला सांगितले. या वेळी तिच्या भावाची भेट घडविण्यासाठी आरोपी तरुणीला कोलकाता येथे घेऊन गेले. यानंतर कोलकाता येथे पोहोचल्यावर आरोपी मनोज याने तिला त्याच्या घरी नेले. या वेळी तेथे या चौघांनी तिच्यावर अतिप्रंसग केला.
यानंतर जळगाव कुऱ्हा येथील अफसर याच्या बहिणीच्या घरी या तरुणीला नेण्यात आले. तेथेही या चौघांनी तिच्यावर अतिप्रंसग केला. चार दिवसांपूर्वी या चौघांच्या तावडीतून सुटलेल्या या पीडित तरुणीने खारघर गाठले. यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang rape on girl
First published on: 25-11-2014 at 06:55 IST