नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच महाविद्यालयातील पदव्युत्तर खनिज तेल तंत्रज्ञान विभागाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त भूशास्त्रविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयातील टाटा असेंब्ली सभागृहात १० जानेवारीला सकाळी ९.४५ वाजता अंबालाल शहा यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्राचार्य डॉ. महेश अंडार या वेळी उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळात सर्वासाठी खुले राहणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध संग्राहक एम. एफ. मक्की यांच्या संग्रहातील विविध दुर्मिळ खनिजे, खडक, हिरे, मौल्यवान खडे, प्राणी आणि वनस्पतींचे प्राचीन अवशेष प्रत्यक्ष पाहून त्यांची माहिती मिळविण्याची संधी या वेळी मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
वाडिया महाविद्यालयात उद्यापासून भूशास्त्रविषयक प्रदर्शनाचे आयोजन
नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच महाविद्यालयातील पदव्युत्तर खनिज तेल तंत्रज्ञान विभागाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त भूशास्त्रविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 09-01-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geografic exhibition from tommarow in vadiya college