लग्नाला नकार दिला म्हणून १७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात बुधवारी नोंदविली आहे.
मिरजेच्या म्हैसाळ वेस परिसरात राहणा-या १७ वर्षांच्या मुलीचे सुनील संभाजी मगदूम (वय २७, रा. सांगली) याने मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मारुती मोटारमधून  अपहरण केले आहे. या मुलीला सुनील मगदूम याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र मुलीच्या पालकांनी या लग्नास विरोध केला होता. त्यामुळे त्याने चिडून मुलीचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.