म्हसरूळ परिसरात प्रभाग पाचमध्ये नगरसेविका शालिनी पवार व रंजना भानसी तसेच माजी नगरसेवक अरुण पवार यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित आनंद मेळाव्यास मेरी-म्हसरूळ व मखमलाबाद परिसरातील महिलांनी प्रतिसाद दिला. महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने श्रीकृष्ण मंगल कार्यालयात हा मेळावा झाला.
मेळाव्याचे उद्घाटन माजी उपमहापौर देवयानी फरांदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संजय वागुळदे, पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव भोसले आदी उपस्थित होते. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली मागणी मिळाली. वस्तू घेण्यासाठी प्रत्येक स्टॉलवर नागरिकांची झुंबड उडाली होती. ५० पेक्षा अधिक स्टॉलमध्ये प्रामुख्याने कपडे, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, फराळाचे पदार्थ, इलेक्ट्रिक साहित्य, खाद्य पदार्थ व विविध गृहोपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सूत्रसंचालन मनीषा एकबोटे यांनी केले. महिला प्रतिनिधी म्हणून मेघा अहिरे, मिता सोमवंशी, उपस्थित होत्या.