केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांसाठी सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती सुनीता बनकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ थोरात होते. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व पंचायत समितीच्या वतीने कारखान्याच्या निवृत्तीभाऊ बनकर सभागृहात आयोजित या शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष गल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजगुरु, डॉ. ब्राम्हणे, डॉ. सर्वज्ञ यांनी तोडणी मजुरांच्या स्त्रीरोग तपासणी, गरोदर माता, बालरोग यासह इतर तपासण्या केल्या. आवश्यक रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यावेळी थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब काळे, सुनीता गायकवाड, डॉ. गल्हे, वंदना राऊत आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांसाठी सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती सुनीता बनकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
First published on: 14-12-2012 at 03:03 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health chek up of sugercane workers