जाणले ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो…
मराठी माणसाच्या भावविश्वावर अधिराज्य गाजविणारे कवीवर्य सुरेश भट यांचा उद्या गुरुवारी, १४ मार्चला स्मृतिदिन आहे. मराठी काव्य क्षेत्राच्या मनोरम वाटिकेत गझलरूपी अमृताचे रोपटे रुजविण्यासाठी त्यांनी आयुष्यात जे काही सोसले आहे, त्याचे वर्णन या कवितेमध्ये आहे. त्यांची गझल म्हणजे खऱ्या अर्थाने तंत्रशुद्ध असून आशयघनतेत कुठेही उणीव नाही. ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर साऱ्या भारताचे भूषण होते. आयुष्यभर कविता, गझल हाच खजिना समजून साहित्य विश्वात एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला होता. विविध अंगानी परिपूर्ण असलेल्या त्यांच्या गझलांची भूरळ नवोदित कवींना न पडली तरच नवल. त्यांच्या हयातीत नव्या दमाची गझलकार पिढी तयार झाली आहे आणि ती आज कवीवर्य भट यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
१४ मार्च २००३ ला सुरेश भट यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने महापालिकेतर्फे त्यांच्या नावाने रेशीमबाग परिसरात अत्याधुनिक साधनांनी असे सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले. त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास जावे, अशी अपेक्षा होती, पण सभागृहाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने भटप्रेमींना अजून किती स्मृतिदिनांची वाट पाहावी लागेल, याकडे नागपूरकर रसिकांचे लक्ष लागले आहे. महापालिका सभागृहात हा प्रस्ताव आणल्यानंतर त्यावर अनेक वर्षे चर्चा झाली. हे सभागृह पश्चिम नागपुरात व्हावे की पूर्व नागपुरात यावरही जवळपास तीन ते चार वर्षे निर्णय झाला नाही.  कागदोपत्री त्यावर कुठलीच कारवाई केली जात नव्हती. महापालिकेत युतीची सत्ता असताना अनेक वर्षांपासून सरकार दरबारी प्रस्तावित असलेल्या सभागृह उभारण्याच्या कामाला हिरवा कंदील मिळाला. १४ जानेवारी २०११ मध्ये सभागृहाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजनानंतर दोन महिन्याने काम सुरू करण्यात आले. सभागृहाचे बांधकाम दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र दोन वर्षांत सभागृहाचे काम केवळ ५० टक्के झाले आहे.  
महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून कामाची गती वाढविली आहे. पश्चिम नागपुरात डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सायंटिफिक सभागृह, साई सभागृह असून पूर्व नागपुरात मात्र सुसज्ज असे सभागृह नाही. पूर्व नागपुरातील या सभागृहाचे बांधकाम केव्हा पूर्ण होईल? याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 

Vidarbha State on the occasion of Maharashtra Day Review of progress Maharashtra Day 2024
विदर्भ: अनुशेष हा शब्द गायब पण वास्तव तेच..
Suresh Halvankar, Kolhapur,
कोल्हापूर : सत्तेत न येणाऱ्याच्याच फुकट देण्याच्या घोषणा – सुरेश हाळवणकर
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..