पर्युशन पर्वात आठपेक्षा अधिक दिवस उपवास केलेल्या व्यक्तींना येथील जैन सोशल ग्रुपच्या वतीने ‘तपस्वी’ हा बहुमान देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रवीण खिंवसरा, विभागीय समन्वयक जयश्री धाडीवाल आदी उपस्थित होते. अध्यक्ष सचिन शाह, सतीश कोठारी, हर्षवर्धन गांधी हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात २५ तपस्वींचा सत्कार करण्यात आला. नाशिकच्या शाखेने आपल्या कार्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी छाप पाडली असल्याचे खिंवसरा यांनी सांगितले. धाडीवाल यांनी नाशिकची शाखा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक सभासद असलेली आहे, असा उल्लेख केला. ही शाखा शिस्तीत चांगले कार्यक्रम करण्यात अग्रेसर असते, असे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2012 रोजी प्रकाशित
जैन सोशल ग्रुपतर्फे २५ तपस्वींचा गौरव
पर्युशन पर्वात आठपेक्षा अधिक दिवस उपवास केलेल्या व्यक्तींना येथील जैन सोशल ग्रुपच्या वतीने ‘तपस्वी’ हा बहुमान देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रवीण खिंवसरा, विभागीय समन्वयक जयश्री धाडीवाल आदी उपस्थित होते. अध्यक्ष सचिन शाह, सतीश कोठारी,

First published on: 30-11-2012 at 12:16 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jain social group inaugurat to 25 tapaswi award