सिडकोच्या वतीने खारघर, सेक्टर ३६ येथे उभारण्यात येणाऱ्या एक हजार २४४ घरांच्या व्हॅलीशिल्प गृहसंकुलात मध्यमवर्गीयांना घर देताना सिडकोने खासगी बिल्डरसारखा अतिरिक्त भार (लोडिंग) ४० टक्केलावला असल्याने १०१५ चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरात केवळ ६०९ चौरस फूट जागा वापरण्यासाठी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या घरांचा दर खासगी बिल्डरप्रमाणे असून त्यांच्याप्रमाणेच हे लोिडग आकारण्यात आले आहे. मध्यमवर्गीयांच्या घरांना हे लोडिंग वापरताना उच्च उत्पन्न वर्गातील ग्राहकांना मात्र ३१ टक्केलोडिंग लावण्यात आले आहे. सरकारने चटई क्षेत्रफळावर दर आकारण्याचे आदेश दिलेले असताना सरकारचीच कंपनी असणाऱ्या सिडकोने मात्र हा दर एकूण क्षेत्रफळावर लागू केला आहे. त्यामुळे या गृहसंकुलात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
खारघर येथे सिडकोने एक हजार २२४ घरांची व्हॅलीशिल्प ही मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहनिर्माण योजना बाजारात विक्रीसाठी आणली आहे. या योजनेत मध्यमवर्गीयांसाठी ८०२ व उच्चवर्गीयांसाठी ४२२ घरांची रचना असून ४२ दुकाने व १०८ कार्यालये आहेत. या घरांची मध्यमवर्गीयासाठी किंमत ४९ ते ६० लाख रुपये आहे, तर उच्च उत्पन्न गटासाठी ९६ ते एक कोटी ७ लाख रुपये किंमत आहे. महागाईच्या काळात ही किंमत खासगी बिल्डरांच्या किमतीएवढीच असल्याचे ग्राहकांचे मत आहे. यात सिडकोने अनेक प्रकारचे आरक्षण ठेवल्याने घर विकताना त्याच आरक्षणातील ग्राहक शोधावे लागणार आहेत. घरे उभारताना सिडकोने दिलेल्या सुविधा, मोकळी, जागा, इमारतीतील जिने यांचे क्षेत्रफळ ग्राहकाकडून वसूल करताना १०१५.४२ चौरस फूट घराच्या क्षेत्रफळात प्रत्यक्षात ६०९.४५ चटई (कारपेट) क्षेत्रफळ ग्राहकाला वापरण्यास मिळणार आहे. या घरांसाठी घेण्यात आलेले दर हे मात्र एकूण क्षेत्रफळावर घेण्यात आलेले आहेत. मात्र उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांच्या घराबाबतीत हे दर कमी करण्यात आले आहेत. त्यांच्या घरांसाठी लोिडग केवळ ३१ टक्के ठेवण्यात आले आहे. थोडक्यात, सर्वसामान्यांना भरुदड आणि उच्च मध्यमवर्गीयांना सवलत असा सिडकोचा अन्याय या प्रकल्पात दिसून येत आहे. या घरांच्या आरक्षणाची शेवटची तारीख गुरुवारी, २० फेब्रुवारी असून ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. सोमवापर्यंत एक हजार २४४ घरांसाठी केवळ एक हजार अर्ज आले असून यात खुल्या वर्गासाठी जास्त पसंती आहे. त्यामुळे आरक्षण ठेवलेले ग्राहक शोधताना सिडकोची दमछाक होणार आहे. त्यात ही खासगी बिल्डरसारखीच क्षेत्रफळ चोरी उघड झाली आहे. जागतिक मंदीमुळे खासगी बिल्डरांकडील आर्थिक चणचण पाहता ग्रुप बुकिंग केल्यास ते मोठय़ा प्रमाणात आर्थिक सवलत देण्यास तयार आहेत. याशिवाय बिल्डरांकडे काळ्या पैशाचे स्वागत होत असून सिडकोकडील सर्व पैसे हे रोखीने द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाकडे अनेक ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kharghar valley shilp housing society cheats with middle class people
First published on: 20-02-2014 at 01:27 IST