पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी करणाऱ्या पत्रकाराला केसरी-मराठा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’ यंदा ‘आऊटलूक’ समूहाचे संपादकीय अध्यक्ष विनोद मेहता यांना जाहीर झाला आहे. ४ जानेवारीला ‘केसरी’ च्या १३२ व्या वर्धापनदिनानिमित्त टिळक वाडय़ाच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
‘केसरी’ चे विश्वस्त सरव्यवस्थापक रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सल्लागार संपादक एस. के. कुलकर्णी त्या वेळी उपस्थित होते. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मेहता यांनी ३८ वर्षांच्या कारकिर्दीत पत्रकारितेत मोठे योगदान दिले आहे. १९७४ मध्ये ‘डेबोनेर’ नियतकालिकाचे मुख्य संपादक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते देशातील सर्वात तरुण संपादक ठरले. संडे ऑब्झव्र्हर, दि इंडियन पोस्ट, दि इंडिपेंडंट व दि पायोनियर (दिल्ली आवृत्ती) यांसह अन्य मोठय़ा प्रकाशनांचे संस्थापक व संपादक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. मेहता हे ‘आऊटलूक’ या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक होते. सलग १७ वर्षे त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. संजय गांधी, मि. एडिटर, हाऊ क्लोज आर यू टू दि पीएम? ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध विषयांवर विपूल लेखन केले असून, २०११ मध्ये प्रकाशित झालेले ‘लखनऊ बॉय’ हे त्यांचे आत्मचरित्र लोकप्रिय ठरले.
पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच या कार्यक्रमात जयंतराव टिळक स्मृती पारितोषिकांचे वितरणही होणार आहे. या वर्षी नेस्पा, परशुराम परांजपे, शरयू सोनावळे, निर्मला पुरंदरे, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा या संस्था व व्यक्तींना या पारितोषिकाने गौरविले जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jan 2013 रोजी प्रकाशित
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार विनोद मेहता यांना जाहीर
पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी करणाऱ्या पत्रकाराला केसरी-मराठा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’ यंदा ‘आऊटलूक’ समूहाचे संपादकीय अध्यक्ष विनोद मेहता यांना जाहीर झाला आहे. ४ जानेवारीला ‘केसरी’ च्या १३२ व्या वर्धापनदिनानिमित्त टिळक
First published on: 03-01-2013 at 03:43 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanya tilak national journalisum award to vinod meheta