महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धा

बँका, कंपन्या, उद्योग, एस. टी. महामंडळ, वीज मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, एलआयसी, जीआयसी इत्यादीमधील कामगारांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सातव्या राज्यस्तरीय औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बँका, कंपन्या, उद्योग, एस. टी. महामंडळ, वीज मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, एलआयसी, जीआयसी इत्यादीमधील कामगारांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सातव्या राज्यस्तरीय औद्योगिक व व्यावसायिक कामगार नाटय़ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वालचंदनगर, पुणे येथे डिसेंबर २०१२ व जानेवारी २०१३ मध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे.
उत्कृष्ट नाटय़ प्रयोगांना १५ हजार, १० हजार, ७ हजार अशा रकमांची पारितोषिके दिली जाणार असून त्याशिवाय लेखन, नेपथ्य, दिग्दर्शन, अभिनय, प्रकाशयोजना यासाठीही पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाटय़ संघांना मंडळाकडून सादरीकरणासाठी ५ हजार रुपये व कमीतकमी दराचा प्रवास खर्चही दिला जाणार आहे. नाटय़संघांनी आपापल्या व्यवस्थापनामार्फत स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.  
स्पर्धेच्या अटी, नियम, प्रवेशिका व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. मुंबई (२४३०६७१७, २६८३१४०१), ठाणे (२५७७१६६३), चिपळूण (२५०६११), पुणे (२४४५९७०६), सोलापूर (२७२६७३७), कोल्हापूर (२६४४७७२), नाशिक (२३५७०७५), जळगाव (२२२९६३६), नागपूर (२७५२०८७, २७४९००४), चंद्रपूर (२७०५९३), औरंगाबाद (२३३१५४६), नांदेड (२२८७२४), अमरावती (७९५५२-२४३०६७१७/२४२२७७५८), अकोला (२४३३२७५) या क्रमांकांवर संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर असून अधिक माहितीसाठी mlwbprog@gmail.com या ईमेलद्वारेही संपर्क साधता येईल. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra kamgar kalyan mandal drama contest worker