कराड तालुक्यात ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडून सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडीमध्ये ३४ ठिकाणी सर्वसाधारणसह इतर गटातील महिलांना सरपंचपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे महिलाराज अवतरल्याचे चित्र आहे.
िहगनोळे आणि घराळवाडी या गावाने ग्रामपंचायतीची सत्ता पूर्णत: महिलांच्या वर्चस्वाखाली राहणार आहे. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीपैकी चिंचणी, मस्करवाडी, कळंत्रेवाडी आणि दुशेरे येथील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी खुले होते. उर्वरित जवळपास सर्व ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असल्यामुळे उपसरपंचपदासाठी रस्सीखेच झाली. नूतन पदाधिकाऱ्यांचे मिरवणुकीसह फटाक्यांची आतषबाजी व  गुलालाची उधळण करीत अभिनंदन करण्यात आले.  
ग्रामपंचायतनिहाय निवड झालेले सरपंच व उपसरपंच पुढीलप्रमाणे – सुपने सरपंच मंगल उत्तम सुमार, उपसरपंच विनोद शामराव शिंदे, डेळेवाडी – सरपंच पारूबाई शिवाजी बाबर, उपसरपंच आप्पासाहेब आनंदा बाबर, अंतवडी-सरपंच सविता युवराज शिंदे, उपसरपंच सुरेश तुकाराम शिंदे, शामगाव-सरपंच मंगल शंकर पोळ, उपसरपंच धोंडीराम श्रीरंग पोळ, किवळ-सरपंच कल्पना रमेश साळुंखे, उपसरपंच सुनील तुकाराम साळुंखे, चिंचणी-सरपंच आबा यशवंत सावंत, उपसरपंच मनीषा अशोक सावंत, जनेकवठे-सरपंच सुमन संभाजी यादव, उपसरपंच सयाजी बाबुराव यादव, पाडळी-हेळगाव-सरपंच मंजुषा शिवाजी भोज, उपसरपंच दिलीप महादेव जाधव, कालगाव-मंजुश्री उध्दव माळी, उपसरपंच उमेश बळीराम चव्हाण, घोलपवाडी-हनुमानवाडी-सरपंच संगिता कैलास अर्जुगडे, उपसरपंच संजय बाळासाहेब जाधव, तारूख-सरपंच मोहिनी दीपक भिसे, उपसरपंच दत्तात्रय शंकर पाटील, ओंडोशी-सरपंच सविता जगन्नाथ फसाले, उपसरपंच उध्दव आनंदराव मोरे, कासारशिरंबे-सरपंच तानाजी आनंदा दळवी, उपसरपंच संजय रामचंद्र चौगुले, विजयनगर-शोभा शशिकांत कुमठेकर, उपसरपंच सुनिल रामचंद्र पाटील. वनवासमाची-सरपंच रूपाली सुभाष चव्हाण, उपसरपंच झाकीर हुसेन रज्जाक मुल्ला, येळगाव-सुचिता रमेश शेटे, उपसरपंच मन्सूर बाबासाहेब इनामदार, वडगाव हवेली-शंकर मारूती ठावरे, उपसरपंच संतोषकुमार श्ांकर जगताप यांची निवड झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahila raj on thirty four gram panchayat in karad taluka
First published on: 26-11-2012 at 10:02 IST