जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या श्रीगोंदे नगरपालिकेवर अखेर राष्ट्रवादीनेच झेंडा फडकवला. एकसंघ झालेल्या काँग्रेसला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुन्हा एकदा पराभूत करताना १९ पैकी १० जागांसह काठावरचे बहुमत मिळवून दिले. काँग्रेसला ८ जागांवरच समाधान मानावे लागले. एक जागेवर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी झाला. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. सर्व जागांवर त्यांचा पराभव झाला.
माजी नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांच्या पराभवाने मात्र राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला. नगरसेवक भाऊसाहेब औटे (राष्ट्रवादी) व वैशाली नंदू ताडे (शिवसेना) यांचाही पराभव झाला. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे भरतकुमार नहाटा हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. जास्त मताधिक्याने विजयी झाले असून विद्यमान नगराध्यक्ष भागचंद गंगाराम घोडके, माजी नगराघ्यक्ष नंदकुमार बोरूडे यांच्यासह फक्कड मोटे, गटनेते मनोहर पोटे, नवनाथ कोथंबिरे व अख्तर सिकंदर शेख व संगीता संतोष मखरे हे विद्यमान नगरसेवक विजयी झाले आहेत.
निकालानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना आमदार बबनराव पाचपुते यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, यापेक्षा मोठा विजय अपेक्षित होता, मात्र पक्षांतर्गत नाराजी मोठी होती. ती दूर करता आली नाही. हा विकासकामांचा विजय आहे. विरोधकांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली. मतदार हुशार आहे. एकच खोटी गोष्ट सातत्याने सांगून गोबेल्स नीतीचा वापर करण्यात आला, मात्र विरोधकांचे उमेदवार भ्रष्ट होते. त्यांना मतदारांनी जागा दाखवून दिली. काँग्रेसचे नेते तथा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा यांनी धनशक्तीचा विजय या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ही लढाई धनशक्ती विरुद्ध होती. त्यांनी प्रचंड पैशाचा वापर केला. याशिवाय दहशत व दडपशाहीचा वापर केला. त्यामुळे आम्हाला निसटता पराभव पत्करावा लागला आहे. अन्यथा पालिका काँग्रेसच्या ताब्यात आली असती.
प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-
प्रभाग १ अ- सुनीता शिंदे- २०४८ (राष्ट्रवादी- विजयी), विमल बोरूडे- १४८४ (काँग्रेस). ब-संगीता मखरे- २१५८ (राष्ट्रवादी- विजयी), अरुणा पोटे- १७४२ (काँग्रेस). क- सुनील वाळके- १९७३ (राष्ट्रवादी- विजयी), राजकुमार लोखंडे- १९२४ (काँग्रेस). ड- मनोहर पोटे- २२५९ (राष्ट्रवादी- विजयी), राजू लोखंडे- १४७९ (काँग्रेस).
प्रभाग २ अ- नवनाथ कोथंबिरे- १६७८ (राष्ट्रवादी- विजयी), मोहन कोथंबिरे- १५६७ (काँग्रेस). ब- कुसुम धांडेकर- १९७२ (काँग्रेस- विजयी), आशाबाई हिरडे- १२४६ (राष्ट्रवादी). क- वैशाली अळेकर- १८६७ (काँग्रेस- विजयी), सुनीता खेतमाळीस- १५३२ (राष्ट्रवादी). ड- दादाराम औटे- १७४२ (काँग्रेस- विजयी), भाऊसाहेब औटे- १३७३ (राष्ट्रवादी).
प्रभाग ३ अ- सुनीता गोरखे- १२४१ (राष्ट्रवादी- विजयी), वैशाली ताडे- १०६६ (शिवसेना). ब- नंदकुमार बोरूडे- १५३७ (काँग्रेस- विजयी), गणेश श्रीराम- १२४३ (राष्ट्रवादी- विजयी). क- गयाबाई सुपेकर- ९८३ (काँग्रेस पुरस्कृत अपक्ष- विजयी), शिरासबी गुलाब हुसेन बेपारी- ९७५ (अपक्ष). ड- अख्तर सिकंदर शेख- १३९७ (राष्ट्रवादी- विजयी), युसूफ इनामदार शेख- १२२२ (काँग्रेस).
प्रभाग ४ अ- मीना शेंडगे- १८०९ (काँग्रेस- विजयी), अनिता खेतमाळीस- ११२८ (राष्ट्रवादी). ब- संगीता खेतमाळीस- १९६५ (काँगेस- विजयी), छाया बनसोडे- ५८१८ (राष्ट्रवादी), क- भरतकुमार नहाटा- २०८८ (काँग्रेस- विजयी), कमलाकर धर्माधिकारी- १३२२ (राष्ट्रवादी). ड- फक्कड मोटे- ११७२ (काँग्रेस- विजयी), सुधीर खेडकर- ११३६ (राष्ट्रवादी).
प्रभाग ५ अ- भागचंद घोडके- १२९५ (राष्ट्रवादी- विजयी), गौतम घोडके- ११६९ (काँगेस). ब-अर्चना गोरे- १८३४ (राष्ट्रवादी-विजयी), कविता सिदनकर- १०१० (काँग्रेस). क- छाया गोरे १८५२ (राष्ट्रवादी- विजयी), सुप्रिया कोथंबिरे- ११२१ (काँग्रेस).
संग्रहित लेख, दिनांक 14th Jan 2014 रोजी प्रकाशित
श्रीगोंदे नगरपालिकेत राष्ट्रवादीला बहुमत
जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या श्रीगोंदे नगरपालिकेवर अखेर राष्ट्रवादीनेच झेंडा फडकवला. एकसंघ झालेल्या काँग्रेसला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुन्हा एकदा पराभूत करताना १९ पैकी १० जागांसह काठावरचे बहुमत मिळवून दिले.
First published on: 14-01-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majority to ncp in shrigonda