विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक इंटरनॅशनल शैक्षणिक संकुलात ‘चला करूया मैत्री गणिताशी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सातवीचे ६० विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते.
गणित हा विषय मनोरंजक बुद्धीला चालना देणारा असतानाही विद्यार्थ्यांना कठीण व कंटाळवाणा वाटतो, याचे कारण गणिताविषयी त्यांच्या मनात असलेली भीती. खरे तर गणित हा विषय क्रमिक व विविध स्पर्धा परीक्षांसाठी अनिवार्य असतो. मात्र, त्याच्या भीतीमुळे शालेय जीवनापासूनच अनेक विद्यार्थी गणितापासून दोन हात दूर राहतात. हे लक्षात घेऊनच या संस्थेने हा अभिनव उपक्रम राबवला. शालेय जीवनातच जर विद्यार्थ्यांची गणिताविषयीची भीती दूर झाली व गणितातील क्लृप्त्या आणि सूत्रे त्यांना अवगत झाली तर भविष्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही हे समजावून देत संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये याविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘चला करूया मैत्री गणिताशी..’
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक इंटरनॅशनल शैक्षणिक संकुलात ‘चला करूया मैत्री गणिताशी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सातवीचे ६० विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते.
First published on: 05-12-2012 at 12:57 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make a friendship with maths