डोंबिवली एमआयडीसीतील ‘एम्स’ रुग्णालयात शवागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना यापूर्वी ठाणे, कल्याण येथे जावे लागत होते.
शहर परिसरातील अनेक नागरिकांचे नातेवाईक, मुले परदेशात नोकरी, शिक्षणासाठी गेली आहेत. अशा कुटुंबांतील कोणा व्यक्तीचे निधन झाल्यास ते शव एक ते दोन दिवस सुस्थितीत ठेवण्यासाठी नातेवाईकांना शवागृहाची सुविधा धुंडाळावी लागत होती. ही सुविधा घेण्यासाठी ठाणे, मुंबई, कल्याण येथे जावे लागत होते. नागरिकांची होणारी ओढाताण विचारात घेऊन एम्स रुग्णालयाने रुग्णालयाच्या आवारात ही सुविधा उपलब्ध केली आहे, असे रुग्णालयाच्या व्यवस्थापक शीतल चौगुले यांनी सांगितले. संपर्क, ७५०६२७४९५९, २४७५०००.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morgue facilities available in dombivali
First published on: 23-05-2014 at 06:46 IST