खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी २० लाख रुपयांचा निधी दिला.
राहाता तालुक्यातील साकुरी गावातील गोदावरी वसाहतीमधील स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, राहाता तालुक्यातील आडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे, कोपरगाव येथे दलित वस्तीमध्ये समाजमंदिर उभारणे, अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे डॉ. आंबेडकर समाजमंदिर उभारणे, नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे मातंग वस्तीत पाण्याची टाकी बांधणे, नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे स्मशानभूमीसाठी वॉल कंपांऊड बांधणे, घोडेगाव येथे रस्ता, अकोले येथे चर्मकार समाजवस्तीत समाजमंदिर बांधणे आदी कामांचा समावेश खासदार राजकुमार धूत यांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये विकासकामांठी निधी दिल्याबद्दल खासदार वाकचौरे यांनी खासदार धूत यांचे आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2013 रोजी प्रकाशित
शिर्डी लोकसभा मतदारसंघात खा. धूत यांचा वीस लाखांचा निधी
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी २० लाख रुपयांचा निधी दिला.
First published on: 12-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp dhut gave 20 lakh rs fund for development of shirdi constituency