मुळशी तालुक्यातील लवळे येथे जमीन वाटपातून एका तरुणाचा कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी पौड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. दोघांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता ३१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हनुमंत लक्ष्मण चांदीलकर(वय २८ रा. लवळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष पांडुरंग चांदीलकर यांनी पौड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार रामदास बबन जाधव (वय २४ रा. गुनाट ता. हवेली) दत्तात्रय रामचंद्र चांदीलकर (वय ५८ रा. लवळे) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवळे येथील गट क्रमांक ५५२ व ५५३ या जमीन वाटपाच्या कारणावरुन पूर्वीही वाद झाले होते. आरोपीबरोबर याच कारणावरून रविवारी झालेल्या भांडणात चांदीलकर यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणात संतोष चांदीलकर, मंगेश चांदीलकर,महेश चांदीलकर,पांडुरंग चांदीलकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणातील इतर आरोपींना अटक करावयाची असल्याने दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
लवळे येथे जमिनीच्या वादातून तरुणाचा खून
मुळशी तालुक्यातील लवळे येथे जमीन वाटपातून एका तरुणाचा कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी पौड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. दोघांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता ३१ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
First published on: 25-12-2012 at 03:16 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered of one in lavle on land qurreal