शहरातील मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेले १५ कैदी असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनसारख्याचाही समावेश असल्याने तुरुंगातील अधिकारी चोवीस तास चौकस राहात आहेत. या कारागृहात चार विदेशी कैदीही अन्य गुन्ह्य़ाखाली शिक्षा भोगत आहेत.
१९९३ मध्ये मुंबईमध्ये काही वेळेच्या अंतराने १२ ठिकाणी स्फोट झाले होते. त्यात २५७ लोक मारले गेले होते.  ७०० लोक जखमी झाले होते. या मुंबई स्फोटाचा सूत्रधार कुख्यात दाऊद व याकूब मेमन असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मेमनला अटक केली. २००७ मध्ये टाडा न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. त्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावल्याने व राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्याने त्याला फाशी होणार हे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. त्यामुळे त्याच्याकडे सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असते. प्रेयसीचा खून केल्यावरून धर्मवीर चव्हाण यालाही फाशीची शिक्षा झाली आहे. त्याने त्याची प्रेयसी धनश्री रामटेके हिचा १४ ऑगस्ट २०१२ रोजी नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळून टाकला होता. परंतु तिच्या पायातील एक चप्पल सापडल्याने पोलिसांनी आरोपीला हुडकून काढले होते. या खुनात त्याला त्याचा मित्र पंकज राऊतकर याने मदत केली होती. न्यायालयाने धर्मवीरला फाशीची तर राऊतकर याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
विविध गुन्ह्य़ात शिक्षा झालेल्या एकूण ६२९ आरोपींही या मध्यवर्ती कारागृहात आहेत. यामध्ये ६०० पुरुष व २९ महिलांचा समावेश आहे. यामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांचाही समावेश आहे. त्यात अनेक सामूहिक व वैयक्तिक हत्याकांडातील आरोपींचा समावेश आहे. यासोबतच ७८ पुरुष व ५ महिला वॉर्डर, ८९ पुरुष व २ महिला वॉचमन, चार विदेशी कैदी, एन.डी.पी.एस. अन्वये शिक्षा झालेले १० पुरुष व २ महिला कैदी तर अन्य ४७ असे एकूण ८८१ कैदी येथे असल्याची माहिती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना उपलब्ध करून दिली. मध्यवर्ती कारागृहात २० मार्च २०१५ रोजी किती कैदी आहेत व किती कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली याची माहिती मागितली होती. १७ सप्टेंबर २०१४ रोजी शिक्षा झालेला एक कैदी कारागृहाच्या बगिच्यात काम करीत होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास तो कारागृहातून पळून गेला होता. सायंकाळी मोजणीच्यावेळी ही बाब लक्षात आली होती. पाच दिवसानंतर त्याला लगेच अटक करण्यात आली.
मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्य़ात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या आवडीनुसार कामे दिली जातात. कुशल असल्यास ५५ रुपये, अर्धकुशल ५० रुपये व अकुशल कैद्यांना ४० रुपये दराने मजुरी दिली जाते. यामध्ये लाकूड काम करणे, कापड विणणे, हातमागावर कापड तयार करणे, विविध कापड शिवणे, बेकरी, शेती काम, कार धुणे व कपडे धुणे आदी कामांचा समावेश आहे. गेल्या १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत येथील कैद्यांनी १ कोटी ३६ लाख, ७७७ रुपये किंमतीचे उत्पन्न घेतले. या वर्षांत लाकूड कामापासून ५९ लाख ०४ हजार ४२२ रुपये, कापड निर्मितीमधून २१ लाख ३४ हजार ६४२ रुपये, हातमागाच्या कामातून १७ लाख ०३ हजार ७२३ रुपये, तसेच बेकरीच्या पदार्थ निर्मितीतून १२ लाख ७० हजार ०४६ रुपयांचे उत्पन्न झाले. तर शेतीवर ५ लाख १२ हजार ६८७ रुपये, कार धुण्यापासून १ लाख ५६ हजार ६७६ रुपये आणि कापड धुण्यापासून २ लाख ०५ हजार ६३५ रुपये उत्पन्न झाल्याची माहितीही देण्यात आली.

Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था