अहमदनगर येथे आठ व नऊ डिसेंबर रोजी आयोजित ‘शरद पवार चषक’ या राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील १५ खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री बबन पाचपुते यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून भाग घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंची नावे नशिक डिस्ट्रीक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशने जाहीर केली. त्यात वसंत मोढा, योगेश लहामगे (यशवंत व्यायामशाळा), अमोल जाधव (बॉडी मास्टर्स जिम), आनंद कदम (लाइफस्टाइल), राजेंद्र पवार, मोहन जांभुळपिठे, अमजद पठाण, सुनील जाधव (सर्व प्लॅनेट जिम), विरेश वाबळे, अनिल मुथा, राजेश कराड, मधुकर सरोदे (सर्व दत्ताजी पाटील व्यायामशाळा), शब्बीर खान, इम्रान शेख, रौफ शेख (सर्व इंडियन हेल्थ क्लब) यांचा समावेश आहे. व्यवस्थापक म्हणून नितीन विरवार, प्रशिक्षक सुनील घरटे व सहप्रशिक्षक म्हणून मनोज कांबळे हे काम पाहणार आहेत. निवड समितीत दीपक बागूल, संजय तेजाळे, प्रशांत गायकवाड, एजाज शेख यांचा समावेश होता.