कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना आणि नाशिक जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतीतील मालकांच्या संघटना यांच्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हास्तरीय औद्योगिक शांतता समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे, चंद्रशेखर कुलकर्णी, सुरेश माळी, संजीव नारंग, रमेश वैश्य, सिटूचे डॉ. डी. एल. कराड, श्रमिक सेनेचे सुनील बागूल, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अमोल सोनवणे आदींसह शासकीय प्रतिनिधी, उपविभागीय अधिकारी, साहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय आदींचा समावेश आहे.
संबंधित उद्योगात काम करणारे कामगार तसेच संघटनेच्या प्रश्नांबाबत सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती कामगार उपायुक्त रा. सु. जाधव यांनी दिली आहे.