संगमनेर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांवर सत्ताधारी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. सर्वच समित्यांच्या सभापतीपदासाठी केवळ एकेकच अर्ज दाखल झाल्याने सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या. सर्वच समित्यांच्या सभापतीपदी प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांच्या निवडी झाल्याने ते कशा पध्दतीने काम पाहतात याची उत्सुकता आहे.
विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी पिठासन अधिकारी संदीप निचित यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष दिलीप पुंड पदसिध्द अध्यक्ष असलेल्या स्थायी समितीवर विरोधी गटाचे नेते राधावल्लभ कासट, सत्ताधारी गटाचे इसहाकखान पठाण, गजेंद्र अभंग, सोमेश्वर दिवटे, प्रमिला अभंग, जुलेखा शेख, नितीन अभंग, सुमित्रा दिड्डी आणि उपनगराध्यक्षा पूनम मुंदडा यांची निवड झाली.
अन्य समित्या व त्यांचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे: सार्वजनिक बांधकाम समिती- सोमेश्वर दिवटे (सभापती), जावेद सय्यद, विवेक कासार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, इम्रान शेख, शोभा परदेशी, ज्ञानेश्वर कर्पे आणि अ‍ॅड. श्रीराम गणपुले. शिक्षण समिती- प्रमिला अभंग (सभापती), शोभा पवार, नजमा मणियार, अंजली तांबे, इसहाकखान पठाण, अनिता कागडे, विवेक कासार, विजया खुळे आणि कैलास वाकचौरे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता- जुलेखा शेख (सभापती), नजमा मणियार, वैशाली बर्गे, शोभा पवार, रत्नमाला लहामगे, अंजली तांबे, ज्ञानेश्वर कर्पे, विजया खुळे आणि कैलास वाकचौरे. पाणीपुरवठा- नितीन अभंग (सभापती), जावेद सय्यद, गोरख कुटे, अंजली तांबे, शोभा पवार, स्वाती ताजणे, राधावल्लभ कासट, अल्पना तांबे आणि अ‍ॅड. श्रीराम गणपुले. महिला व बालकल्याण- सुमित्रा दिड्डी (सभापती), विजया खुळे (उपसभापती), रत्नमाला लहामगे, वैशाली बर्गे, स्वाती ताजणे, अंजली तांबे, अनिता कागडे, अल्पना तांबे आणि गणेश मादास. नियोजन आणि विकास- उपनगराध्यक्षा पूनम मुंदडा (पदसिध्द सभापती), जावेद सय्यद, इम्रान शेख, गोरख कुटे, शकील शेख, गणेश मादास, विवेक कासार, शोभा परदेशी आणि ज्ञानेश्वर कर्पे.
विषय समित्यांच्या पदाधिकारी निवडीनंतर माजी नगराध्यक्षा अंजली तांबे, माजी नगराध्यक्ष राधावल्लभ कासट, नगराध्यक्ष दिलीप पुंड, उपनगराध्यक्षा पूनम मुंदडा, ज्येष्ठ सदस्य जावेद सय्यद यांची भाषणे झाली. मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे
यांच्यासह सर्व सदस्य यावेळी सभागृहात उपस्थित होते. पालिकेच्या प्रांगणात पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.