लष्कर पाणीपुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) केले जाणार असल्यामुळे येरवडा भाग तसेच मंगळवार पेठ वगैरे भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीकामामुळे पुढील भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहील. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, नागपूर चाळ, संजय पार्क, टिंगरेनगरचा काही भाग, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन परिसर, घोरपडी, शांतीरक्षक सोसायटी आणि पुणे-मुंबई रस्त्याचा काही भाग.