माध्यमिक शिक्षकांची ‘जिल्हा शिक्षक भारती’ ही नवीन संघटना स्थापन करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब लोंढे, कार्याध्यक्षपदी सुनिल गाडगे व सचिवपदी मोहमदसमी शेख यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांची निवडी अजय बारगळ, रावसाहेब बाबर व रेवन घंगाळे (सल्लागार) यांनी जाहीर केल्या. नूतन संघटना नोंदणीकृत व सरकारमान्य असल्याचे व सर्व तालुक्यांना न्याय देत लोकशाही पद्धतीने कार्यकारिणी निवडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
इतर पदाधिकारी असे: उपाध्यक्ष-सुधीर शेडगे (अकोले), संदिप घोगरे (संगमनेर), अप्पासाहेब जगताप (कर्जत), अनिकेत भालेराव, प्रशांत कुलकर्णी व रंगनाथ मोटे (नगर). मानद सचिव-सीताराम बुचकूल, अशोक धनवडे व हनुमंत रायकर (श्रीगोंदे). सहसचिव-बापूसाहेब गायकवाड, बाळासाहेब जठार (श्रीगोंदे), जॉन सोनवणे, संतोष काळापहाड (वांबोरी), सुनील गायकवाड (पारनेर) व अजित धुळे (राहाता). कोषाध्यक्ष- संभाजी चौधरी. हिशेब तपासणीस- सचिन गावडे. सदस्य-रंगनाथ वाघ, नंदू नागवडे, अशोक बांदल, अकिल शेख, हनुमंत सोनवणे, यशवंत कडुस, दीपक गोंधळे, संदिप कसाब, संजय विटनोर, रवींद्र पंडित, उपेंद्र अमोलिक व विनायक चौधरी.