राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या येत्या पदवी प्रदान समारंभात डॉ. राजेंद्र जाधव स्मृती सुवर्ण पदकाची भर पडणार आहे.
हे पदक खास अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेत सवरेत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रदान करण्यात येणार आहे.
 व्यवस्थापन परिषद सदस्य दिवंगत डॉ. राजेंद्र जाधव(नंदू) यांच्या मित्र परिवाराने त्यांच्या नावाने सुवर्णपदक देण्याची मनीषा कुलगुरूंकडे व्यक्त केली. डॉ. जाधव यांचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे सुवर्ण पदक देण्याचे योजिले असल्याचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी.के. अग्रवाल यांनी कळवले आहे. त्यासाठी ८१ हजार रुपयांची देणगी वडील त्र्यंबकराव जाधव आणि रजनी राजेंद्र जाधव आणि यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
आगामी १००व्या पदवी प्रदान कार्यक्रमात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेत सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या  विद्यार्थ्यांला हे सुवर्णपदक दिले
जाईल.