कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बहुराज्य शेडय़ुल्ड बँकेच्या पुणे येथील हडपसर शाखेचे उद्घाटन आज मंगळवारी शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्याच दिवशी पुणेकर ग्राहकांनी बँकेत खाते उघडण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला. व्यापारी, उद्योजक, नोकरदारअशा विविध क्षेत्रांतील ग्राहकांनी बँकेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या बँकेच्या पुणे येथे तीन शाखा सुरू आहेत. आता हडपसर येथे चौथी शाखा सुरू झाली असून बँकेच्या एकूण ३७ शाखा सुरू झाल्या आहेत. हडपसर शाखा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचेसंस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.    
या कार्यक्रमास माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदतीकर, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सरव्यवस्थापक पी.टी.कुंभार, संचालक राजू पाटील, विलास पाडळे, पुरुषोत्तम चाखोटिया, उगमचंद गांधी, पांडुनाना बिरंजे, सुनील हावळ, रमेश केटकाळे, राहुल आवाडे, सहायक सरव्यवस्थापक रमेश निपाणीकर, कामगार महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र बचाटे उपस्थित होते.