देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पालांदूर-जमी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी ओमराव झमक कोरचे (१३, रा. रामगड) याला सर्पदंश झाला. त्याला चिचगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.
सर्पदंशाच्या दुसऱ्या घटनेत देवरी येथील राम संतोष महानंद (१८) याला सर्पदंश झाला. त्याला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्पदंशाच्या तिसऱ्या घटनेत सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोसाटोला येथील अजंता राधेश्याम उके (२३) याला सर्पदंश झाला. त्याला सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, या तिघांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिघांवर गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palandur ashram school student critical due to snake bite
First published on: 12-12-2013 at 09:19 IST