सुदृढ आरोग्य आणि इंधनाची बचत करून पर्यावरणाचा समतोल राखण्याविषयी गावागावातून समाजप्रबोधन करण्याकरिता एक अनोखी सायकल दिंडी अंबड येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
सिडकोतील भांड न्यूजपेपर एजन्सीचे संचालक प्रल्हाद भांड हे शिवाजी कुंदे व प्रकाश देशपांडे या सहकाऱ्यांसह सायकलीने पंढरीची वारी करणार आहेत. या वारीदरम्यान भांड व त्यांचे सहकारी इंधन बचत व पर्यावरण रक्षणार्थ समाजप्रबोधन करणार आहेत. काबाडकष्ट करूनही शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही.  शेतकऱ्यांना सुख मिळावे आणि राज्यात भरपूर पाऊस पडावा यासाठी पांडुरंगाला साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती भांड यांनी दिली. भांड हे सलग ११ वर्षांपासून नाशिक ते शेगाव हे ४५० किलोमीटर अंतर सायकलीने चार दिवसांत पार करतात. ते पंढरपूरसाठी सायकलीवर निघाले त्याप्रसंगी नगरसेवक तानाजी जायभावे, सुवर्णा मटाले, अनिल मटाले, प्रदीप पेशकार, दीपक मटाले आदींसह शेकडो वारकरी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandhari wari by cycle for environmental awareness
First published on: 27-06-2014 at 07:10 IST