‘इंडियन एरोबायोलॉजिकल सोसायटी’ तर्फे ‘इम्पॅक्ट ऑफ एअरबॉर्न माइक्रोब्ज’ या विषयावर तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १३ डिसेंबरपासून या परिषदेला सुरुवात होणार असून कृषी, आरोग्य, पर्यावरण, औषधनिर्माण अशा विविध क्षेत्रांतील सुमारे दोनशे शास्त्रज्ञ आणि संशोधक या परिषदेत सहभाग घेणार आहेत. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या हवेच्या विघटनाबाबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे.
कोथरूडमधील माईर्स एमआयटी येथे होणाऱ्या या परिषदेचे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. एअरोबायोलॉजी क्षेत्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. टी. टिळक आणि डॉ. सुनिर्मल चंदा यांना परिषदेत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच परिषदेत सवरेत्कृष्ट निबंध सादर करणाऱ्या तीन तरुण संशोधकांना ‘डॉ. पी. एच. ग्रेगरी पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.